Dharwad

धारवाडमध्ये इंधन टंचाईमुळे सरपणाच्या मागणीत मोठी वाढ

Share

अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीचा थेट फटका आता धारवाडमधील एलपीजी वापरकर्त्यांना बसू लागला आहे. गॅस सिलिंडरच्या वाढत्या टंचाईमुळे धारवाडमध्ये सरपण आणि लाकडाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

धारवाडमधील हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांसह सामान्य नागरिक आता एलपीजी अभावी पुन्हा चुलीकडे वळू लागले आहेत. युद्धामुळे उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे धारवाडमध्ये लाकूड आणि सरपणाच्या दरात प्रति किलो ९० ते १०० रुपयांची वाढ झाली असून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

युद्ध सुरू होण्यापूर्वी धारवाडमध्ये दिवसाला सरासरी १ ते १.५ टन लाकडाची विक्री होत होती, मात्र आता गॅस सिलिंडर मिळत नसल्याने ही विक्री २ ते ३ टनांवर पोहोचली आहे. पूर्वी १००० रुपये प्रति क्विंटल असलेला दर आता १२०० रुपयांपर्यंत वाढला असून, इंधन टंचाईमुळे जनतेला नाईलाजाने जुन्या चूल पद्धतीचा आधार घ्यावा लागत आहे. अशा भावना धारवाडमधील नागरिकांनी व्यक्त केल्या.

Tags: