बेळगावमधील ऐतिहासिक इम्माकुलेट कन्सेप्शन चर्चच्या आवारात येशू ख्रिस्तांच्या जीवनातील शेवटच्या कालखंडावर आधारित ‘लाईव्ह पॅशन ऑफ क्राइस्ट’ हा कार्यक्रम अत्यंत श्रद्धापूर्वक वातावरणात पार पडला.


बेळगावमधील प्रमुख धार्मिक केंद्र असलेल्या इम्माकुलेट कन्सेप्शन चर्चमध्ये गुड फ्रायडेनिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पॅरिश प्रीस्ट फादर दिनेश रॉड्रिग्स, फादर सिरिल ब्रॅग्स आणि फादर विजय डिसोझा यांनी या उपक्रमाला चालना देत मार्गदर्शन केले. येशू ख्रिस्तांना सुळावर चढवण्यापर्यंतच्या घटनांचे हुबेहूब सादरीकरण करण्यात आल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.


या मोठ्या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी रेमंड वाज, सिरिल कार्व्हालो, निकी कार्व्हालो, थॉमस लोबो, अग्नेल रॉड्रिक्स, फ्रान्सिस लोबो, कॅसिटन डिसोझा आणि विल्यम पचाको यांनी विशेष परिश्रम घेतले. इम्माकुलेट कन्सेप्शन चर्चच्या युवा घटकातील सदस्यांच्या सक्रिय सहभागामुळे ख्रिस्तांच्या बलिदानाचा हा स्मृती सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.
या सोहळ्यासाठी बेळगावमधील हजारो भाविकांनी उपस्थित राहून प्रार्थना केली. ख्रिस्तांच्या कठीण प्रवासाचे चित्रण करणाऱ्या कलाकारांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. समाजात शांतता, सौहार्द आणि प्रेम टिकून राहावे या उद्देशाने यावर्षीच्या ‘लाईव्ह पॅशन ऑफ क्राइस्ट’ कार्यक्रमाचे शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले होते.


Recent Comments