बेळगावमधील शिवबसवनगर येथील कारंजीमठात २९८ वा शिवानुभव आणि वीरविरागिणी अक्का महादेवी जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, ६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता मठाच्या शिवानुभव मंडपात हा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे सान्निध्य कारंजीमठाचे पूज्य श्री म.नि.प्र. गुरुसिद्ध महास्वामीजी भूषवणार असून, अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या जिल्हा घटकाच्या अध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
या सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून शरणे प्रेमक्का अंगडी उपस्थित राहणार असून, त्या “सार्थक जीवनासाठी महादेवी अक्कांचा संदेश” या विषयावर विशेष व्याख्यान देतील. मानवी जीवनात अक्का महादेवींच्या वचनांचे आणि विचारांचे महत्त्व त्या आपल्या मार्गदर्शनातून मांडणार आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कार्यक्रमाची सुरुवात कारंजीमठाच्या कुमारेश्वर संगीत पाठशाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रार्थना गायनाने होईल. या भक्तीमय कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री मठाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.


Recent Comments