भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बेळगावमधील सरदार्स मैदानावर ‘बाबासाहेब भीमराव आंबेडकर क्रिकेट टूर्नामेंट’चे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी या क्रीडा स्पर्धेचे स्वरूप स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शाळांच्या परीक्षा संपल्या असून सुट्ट्यांचा काळ लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेतला आहे. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सरदार्स मैदानावर भव्य सोहळ्यात ट्रॉफीचे अनावरण करण्यात येईल.
याच उपक्रमाचा भाग म्हणून २७, २८ आणि २९ एप्रिल रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. हा कोणताही राजकीय कार्यक्रम नसून सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व समाजातील नागरिकांनी पक्षभेद विसरून यात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार आसिफ सेठ यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला दलित नेते मल्लेश चौगुले, सिद्धप्पा कांबळे, गजानन धरनायक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments