Belagavi

बेळगावमध्ये गो-सन्मान अभियानाला पाठिंबा

Share

गोमाता ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करावी आणि गोहत्या बंदीची कडक अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी बेळगावात व्यापक अभियान राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून येत्या २७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

बेळगावमधील माळ मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त ‘गो-सन्मान’ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवत स्वाक्षरी मोहिमेला पाठिंबा दिला. गोहत्या पूर्णपणे बंद व्हावी आणि गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या चळवळीला गती देण्यासाठी आता २७ एप्रिल रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुका कार्यालयांवर निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी आणि गो-प्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. हनुमान जयंतीपासून सुरू झालेल्या या स्वाक्षरी मोहिमेला मिळणारा प्रतिसाद पाहता, २७ एप्रिल रोजी होणाऱ्या आंदोलनाची तयारी जोमाने सुरू आहे. समाजातील विविध स्तरांतून या मागणीला पाठबळ मिळत असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

Tags: