बेळगावमधील रामतीर्थनगर येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक हनुमान मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली असून भक्तिमय वातावरणात हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

हनुमान जयंतीनिमित्त पहाटे रुद्राभिषेक आणि विशेष पूजा विधी पार पडले. या निमित्ताने स्थानिक भजनी मंडळाच्या वतीने मंदिरात भजन, पालखी सोहळ्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

रामतीर्थनगरमधील प्रमुख मार्गांवरून पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखीसमोर ढोल-ताशांच्या गजरात भाविकांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर परिसरात पालखी सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांचा सत्कार करून गौरविण्यात आले. भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.

या कार्यक्रमात रामतीर्थनगरमधील नागरिक, युवक मंडळाचे पदाधिकारी आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Recent Comments