Belagavi

सुळेभावीमध्ये श्री कल्मेश्वर यात्रोत्सवानिमित्त आध्यात्मिक प्रवचन संपन्न

Share

भारत देश हा संस्कृती, आचार-विचार आणि सनातन परंपरेने नटलेला असून, आध्यात्मिक क्षेत्रात भारताचे स्थान जगात सर्वोच्च आहे, असे प्रतिपादन होन्नीहाळचे श्री बसवराज देव यांनी केले.

बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथील बाजार गल्लीत श्री कल्मेश्वर यात्रोत्सव आणि पं. पुट्टराज गवई यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त आयोजित आध्यात्मिक प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय धर्माची व्याप्ती आणि हिंदू धर्माची महानता अधोरेखित केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीशैल शास्त्री हिरेमठ होते. त्यांनी जीवनात गुरूंचे महत्त्व आणि ईश्वरी नामाचे सामर्थ्य विशद केले.

यावेळी आंध्र प्रदेशातील कलमाठ अदोनीचे श्री गुरुसिद्ध देव यांनी मानवी मूल्यांवर प्रकाश टाकला.

या सोहळ्यात श्री कल्मेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष बसनागौडा हुंकरीपाटील, महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष देवण्णा बंगेन्नवर, वकील श्रीरंग कुलकर्णी, बसवराज अण्णिगेरी आणि पत्रकार भैरोबा कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वनाथ हेब्बाळी यांनी केले. प्रवचनानंतर तिगडी आणि सुळेभावी येथील भजनी मंडळांचा कार्यक्रम पार पडला.

Tags: