Belagavi

बेळगाव : हनुमान नगरमध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तीभावात संपन्न

Share

बेळगावमधील हनुमान नगर येथील हनुमान मंदिरात हनुमान नगर रहिवासी क्षेमाभिवृद्धी संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंतीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी श्री हनुमानाच्या मूर्तीला विशेष अभिषेक, अलंकार पूजा आणि महाआरती करून जन्मोत्सवाचा प्रारंभ झाला. महिलावर्गाचा उपस्थितीत पाळणा सोहळा पार पडल्यानंतर अनेक विविध धार्मिक विधी संपन्न झाले.

यावेळी बोलताना संस्थेचे सचिव दिवाकर देशपांडे यांनी सांगितले की, “२००८ पासून सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव आणि महाप्रसाद आयोजित केला जातो. यंदा सुमारे ७ ते ८ हजार भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे, सध्या मध्य-पूर्वेतील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे सावट दूर व्हावे आणि जगात शांतता नांदावी, यासाठी श्री हनुमानाला विशेष साकडे घालण्यात आले आहे.

या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष राहुल मेत्री, उपाध्यक्ष जी. ए. अलगुंडगी, एस. एस. पावटे, एम. वाय. प्रभू यांच्यासह संघटनेच्या इतर सदस्यांनी परिश्रम घेतले. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

Tags: