विजापूर शहरात गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने हनुमान जयंतीच्या महाप्रसादावर त्याचे थेट परिणाम दिसून आले आहेत. गॅस उपलब्ध नसल्यामुळे शहरातील मधला मारुती मंदिरात लाकडी चुलीचा वापर करून भाविकांसाठी प्रसाद तयार करावा लागला.
मध्य-पूर्वेतील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाला असून, त्याचा फटका आता स्थानिक स्तरावरील धार्मिक कार्यक्रमांना बसत आहे. विजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सिलिंडरचा मोठा अभाव जाणवत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
शहरातील प्रसिद्ध मधला मारुती मंदिरामध्ये दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे वाटप केले जाते. मात्र, यंदा सिलिंडर न मिळाल्याने स्वयंपाकासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. अखेर समितीने लाकडी चुली मांडून त्यावर अन्न शिजवण्याचा निर्णय घेतला.
अन्न, सार आणि शिरा यांसारखे प्रसादाचे पदार्थ लाकडी चुलीवर तयार करून भाविकांना त्याचे वाटप करण्यात आले. गॅस टंचाईचे सावट केवळ घरगुती वापरापुरते मर्यादित न राहता सार्वजनिक उत्सवांवरही आल्याने या जागतिक संकटाची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत आहे.


Recent Comments