बेळगाव उपनगरातील मजगाव येथील भगवान श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव अत्यंत थाटामाटात साजरा करण्यात आला. यानिमित्त भगवान महावीरांच्या उत्सव मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

परमपूज्य १०८ महानसागर मुनीजींच्या मंगल सानिध्यात या मूर्तीचे निर्माण कार्य आणि धार्मिक विधी पार पडले. जैन धर्मातील हा अत्यंत पवित्र उत्सव असून, आपल्या पाप कर्मांचा नाश करण्यासाठी आणि पुण्याचे संवर्धन करण्यासाठी भाविकांनी अशा उत्सवांचा लाभ घ्यावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. संपूर्ण मजगाव ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा सोहळा साजरा केला.

या मिरवणुकीत सर्व श्रावक-श्राविकांनी सहकुटुंब सहभाग घेऊन पुण्य लाभ घेतला. चित्ररथासमोर जैन बांधवांनी भक्तीभावाने नृत्य करत भगवान महावीरांना अभिवादन केले. याप्रसंगी मजगाव पंच कमिटी, चातुर्मास कमिटी, युवक मंडळ, महिला मंडळ तसेच पाठशाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Recent Comments