Belagavi

खंजर गल्लीत प्राथमिक आरोग्य केंद्राचा शुभारंभ

Share

बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील खंजर गल्ली येथे आमदार आसिफ सेठ यांच्या विशेष प्रयत्नातून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येत असून, आज या कामाचा शुभारंभ आमदारांच्या हस्ते करण्यात आला.

शहरातील मध्यवर्ती भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांची मोठी कमतरता होती. यापूर्वी छत्रपती शिवाजी नगर, वैभव नगर, बसवन कुडची आणि कणबर्गी येथे आरोग्य केंद्रे उभारण्यात आली आहेत. आता खंजर गल्लीमध्ये आमदार निधीतून ३५ लाख रुपये खर्चून हे नवीन केंद्र उभारले जात आहे. येथे दोन डॉक्टर आणि कर्मचारी कार्यरत असतील, तसेच तपासणी व औषधे पूर्णपणे मोफत मिळतील. उत्तर मतदारसंघात आगामी काळात आणखी २-३ प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्याचा आमचा मानस आहे, असे आमदार आसिफ सेठ यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकारी गडादी यांनी आमदारांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रक्ताची तपासणी किंवा किरकोळ उपचारांसाठी स्थानिक नागरिकांना जिल्हा रुग्णालयात जावे लागत होते. मात्र, आता ही सोय स्थानिक स्तरावर उपलब्ध झाल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी नगरसेवक मुजम्मील ढोणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: