बेळगावमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर जय भीम विकास मंडळ आणि ज्योतिबा फुले युवक मंडळाच्या संयुक्त बैठकीत यावर्षीचा उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी सचिन कुरणे तर उपाध्यक्षपदी उमेश माळगीमनी यांची निवड झाली आहे. इतर पदाधिकाऱ्यांमध्ये सचिव म्हणून व्यंकटेश आदिआंध्र, खजिनदार विवेक राव आणि उप-खजिनदार म्हणून गुंडू गुंडप्पणवर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
निवड झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांनी यावर्षी सर्वांच्या सहकार्याने जयंती सोहळा ऐतिहासिक आणि दिमाखदार पद्धतीने साजरा करण्याची घोषणा केली आहे.


Recent Comments