Belagavi

बेळगावात सावित्रीबाई फुले शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा पुरस्कारांचे वितरण

Share

बेळगावमधील कुमार गंधर्व कलामंदिर येथे कर्नाटक सावित्रीबाई फुले शिक्षिका संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला जनवाडा येथील अल्लमप्रभू आश्रमाचे परमपूज्य श्री मल्लिकार्जुन स्वामीजींचे सान्निध्य लाभले. राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. लता एस. मुळ्ळूर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन पार पडले. जिल्हाध्यक्षा नसरीनबानू काशीमनवर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी शिक्षण उपसंचालिका लीलावती हिरेमठ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून क्षेत्र शिक्षणाधिकारी आंजनेय आर. के. आणि रवी भजंत्री, साहित्य अकादमी सदस्या डॉ. मैत्रेयीणी गदगेप्पगौडर उपस्थित होत्या. तसेच क्षेत्र समन्वय अधिकारी आय. डी. हिरेमठ, डॉ. दानम्मा झळकी, उपप्राचार्य डॉ. एम. एस. मेदार, माजी जिल्हा पंचायत सदस्य आनंदगौडा काद्रोळी यांच्यासह अन्वर लंगोटी, एस. जी. करंबळ्ळी, सुरेश सक्रेण्णवर, एल. बी. नायक, बी. बी. हत्तीहोळी आणि एम. वाय. मेणसीनकायी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संघाच्या जिल्हा सरचिटणीस पुष्पा बन्नीनायकर, कोषाध्यक्षा जयश्री डेकुळी, उपाध्यक्ष फिलीन बानू सौदागर, विजया पाटील, फमिदा मनियार, सुरेखा बी. नवलगुंदे, सुजाता अरबळ्ळी यांच्यासह फराजना औटी, राजश्री कांबळे, खुर्शिदा मुल्ला, अंजना कोळी, श्रीदेवी अंगदळ्ळी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Tags: