Belagavi

शिवाजी नगर आणि शिवबसवनगर परिसरात ‘रामोत्सव’ उत्साहात

Share

शहरातील शिवाजी नगर आणि शिवबसवनगर परिसरात आयोजित ‘रामोत्सव’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्यासाठी गणेशपूर, सैनिक नगर येथील प. पू. श्री हरी गुरु महाराज मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी प्रभू श्रीरामांच्या आदर्श जीवनावर आणि रामोत्सवाच्या आध्यात्मिक महत्त्वावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजच्या काळात प्रत्येकाने प्रभू रामांचे विचार आचरणात आणणे हीच खरी रामभक्ती ठरेल, असे स्वामीजी म्हणाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. जगदीश सुरन्नवर यांनी भूषवले. व्यासपीठावर नगर अध्यक्ष आनंद करलिंगण्णवर, नगर सचिव नागेश कांबळे, क्षेत्र सामरस्य प्रमुख श्रीकृष्ण भट, कार्यवाह मंजू उप्पार यांसह परिसरातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: