Belagavi

बेळगावमध्ये भीम आर्मी एकता मिशनचे थाटात लोकार्पण

Share

बेळगावमध्ये आज भीम आर्मी एकता मिशनच्या कर्नाटक राज्य घटकाचे लोकार्पण आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला.

बेळगावमध्ये आयोजित भीम आर्मी एकता मिशनच्या कार्यक्रमात नूतन पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी स्वीकारली. संघटनेच्या राज्य गौरव अध्यक्षपदी तुकाराम कांबळे, तर प्रदेशाध्यक्षपदी संतोष केम्प यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत उपाध्यक्षपदी दीपक आदिवासी, सरचिटणीसपदी अजयकुमार आदिआंध्रा आणि कार्याध्यक्ष म्हणून अशोक कोलकार यांनी पदभार स्वीकारला.

पदग्रहण केल्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या मंत्रानुसार ही संघटना कार्य करेल, असे संतोष केम्प यांनी सांगितले. शोषितांच्या हक्कासाठी आणि दलितांचा आवाज म्हणून भीम आर्मी एकता मिशन राज्यभर सक्रिय होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या या नूतन टीमने शोषितांना कायदेशीर सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी जनजागृती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. समाजात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध भीम आर्मी एकता मिशन एक प्रबळ शक्ती म्हणून उभी राहील, असा विश्वास संघटनेच्या नेत्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Tags: