Chikkodi

चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत कॉपीचा सुळसुळाट

Share

चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर कॉपी सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना नक्कल करण्यासाठी केंद्रावरील शिक्षक आणि कर्मचारीच मदत करत असल्याचा गंभीर आरोप गुरुवारी करण्यात आला आहे.

चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार होत असल्याच्या चर्चेने मोठी खळबळ उडाली आहे. रायबाग तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांवर हा सावळा गोंधळ सुरू असल्याचे समोर आले असून, केंद्रावरील कर्मचारीच विद्यार्थ्यांना उत्तरे सांगत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाबाबत एका विद्यार्थ्याने दिलेली धक्कादायक माहिती असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यावरून मोठी चर्चा रंगली आहे.

नक्कल रोखण्यासाठी शिक्षण विभागाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह अनेक कडक पावले उचलली असल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागाने यावर तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर हे गैरप्रकार अधिक वाढण्याची भीती व्यक्त करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Tags: