धारवाड: जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा निर्माण झालेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी आर. स्नेहल यांनी दिले आहे.
पेट्रोल पंपांवर होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थिती स्पष्ट केली. धारवाड जिल्ह्यात दररोज सरासरी ६० ते ६५ केएल पेट्रोल आणि डिझेलची विक्री होते. मात्र, इंधन टंचाईच्या अफवेमुळे शेजारील जिल्ह्यांतील नागरिकही धारवाडमध्ये येत असल्याने सध्या ही विक्री १०० ते ११० केएलपर्यंत पोहोचली आहे. मागणी वाढली असली तरी जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध आहे.
काही पेट्रोल पंप चालकांनी गर्दीच्या तणावामुळे विक्री बंद ठेवली असावी, मात्र इंधन संपताच पुन्हा रिफिलिंगची व्यवस्था केली जात आहे. नागरिकांनी पंपांवर विनाकारण रांगा लावू नयेत आणि अफवांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. स्नेहल यांनी केले आहे.


Recent Comments