Belagavi

गुड्स शेड रोडच्या दुरुस्तीला अखेर प्रारंभ

Share

गेल्या ७ वर्षांपासून अत्यंत दुरवस्थेत असलेल्या बेळगाव येथील गुड्स शेड रोडच्या दुरुस्तीचे काम अखेर महापालिकेने हाती घेतले आहे.

शास्त्रीनगर, गुड्स शेड रोड, संतसेना रस्ता, आठवले गल्ली आणि कपिलेश्वर कॉलनीतील रहिवाशांनी या समस्येबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्याची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने शासकीय सुट्टी असूनही तातडीने जेसीबीच्या साह्याने रोड समतोल करण्याचे काम सुरू केले.

प्र प्रशासनाने तात्पुरती डागडुजी सुरू केल्याबद्दल स्थानिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी गुड्स शेड रोडचा प्रश्न कायमस्वरूपी आणि शास्त्रीय पद्धतीने सोडवावा, अशी ठाम मागणी केली आहे.

Tags: