Belagavi

बेळगावच्या ‘बिम्स’मध्ये वैद्यकीय बिलासाठी लाचेची मागणी

Share

बेळगावमधील ‘बिम्स’ रुग्णालय सध्या भ्रष्टाचाराचे केंद्र बनत असल्याची शंका उपस्थित होत आहे. वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्ती करण्यासाठी एका सरकारी अधिकाऱ्याने उघडपणे लाचेची मागणी केल्याचा प्रकार समोर आला असून या संदर्भातील ऑडिओ क्लिपमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

बिम्स रुग्णालयातील वैद्यकीय बिलांची कागदपत्रे मंजूर करण्यासाठी एका अधिकाऱ्याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा गंभीर आरोप आहे. संबंधित अधिकाऱ्याने यापूर्वीच ७ हजार रुपये घेतले असून, रुग्णाने हतबलता व्यक्त करूनही “आणखी ५ हजार रुपये द्या”, असा तगादा लावल्याचे ऑडिओमध्ये स्पष्ट झाले आहे.

हा प्रकार समजताच कर्नाटक रक्षण वेदिकेच्या स्वाभिमानी गटाचे जिल्हाध्यक्ष ईश्वरगौडा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्याला गाठून जोरदार तडाखा दिला. लाचेची ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, गरिबांची अडवणूक करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांविरुद्ध जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Tags: