चिक्कोडी शहराच्या बाहेरील परिसरात रात्री दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
या अपघातात अप्पासाब लक्ष्मण काळे आणि मिरासाब मुलतानी अशी जखमींची नावे आहेत. दोन्ही दुचाकींची धडक इतकी जोरात होती की दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी वाहतूक पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला. हा अपघात चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Recent Comments