ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवणारे पॅटसन
तीन महिन्यांत २०० वाहनांचे वितरण
पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांचा मोठा प्रतिसाद
बेळगावमधील ऑटोमोबाईल क्षेत्रात आघाडीवर असलेल्या पॅटसन टोयोटा शोरूममध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ग्राहकांनी पॅटसन टोयोटाच्या विश्वासार्ह सेवेला पसंती देत एकाच दिवशी २८ कारची खरेदी केली आहे.
बेळगावमधील वाहन क्षेत्रात पॅटसन कंपनीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पॅटसन टोयोटा शोरूमने आपली सेवा अधिक विस्तारली असून ग्राहकांसाठी नवनवीन वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ग्राहकांनी वाहने खरेदी करून पॅटसनने दिलेल्या उत्तम सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.
बेळगावमधील पॅटसन म्हणजे ग्राहकांसाठी विश्वास आणि आशेचा किरण आहे. येथील दर्जेदार सेवेवर विश्वास ठेवून ग्राहक आवडीच्या वाहनांची खरेदी करतात. ग्राहकांचे प्रेम आणि विश्वास संपादन करणाऱ्या पॅटसनचे शहरात दोन शोरूम आहेत. एक उद्यमबाग मध्ये तर दुसरे जुन्या पी.बी. रोडवर आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. याच अनुषंगाने आज पॅटसन टोयोटा शोरूममध्ये बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवीन वाहने खरेदी केली.
नवीन वाहने खरेदी करून आपला सण अधिक आनंदाने साजरा करणाऱ्या ग्राहकांचे पॅटसन टोयोटाचे एम.डी. हर्ष पाटील यांनी स्वागत करून त्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सेल्स जनरल मॅनेजर समी जकाती आणि जनरल मॅनेजर सर्व्हिस ज्ञानेश देसाई यांनीही ग्राहकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ग्राहकांचा हा विश्वास आणि प्रेम सदैव असेच कायम राहावे, अशी भावना हर्ष पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी नवीन कार खरेदी केल्याचा आनंद ग्राहकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पॅटसन टोयोटाच्या सेवेबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. अनेक दिवसांपासून पॅटसन टोयोटाचे नाव आणि त्यांच्या सेवेबद्दल ऐकून होतो, आज त्यांच्याकडून वाहन खरेदी केल्यानंतर त्यांची सेवा खरोखरच अतुलनीय असल्याचे अनुभवले, अशी प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली.
बेळगावमध्ये पॅटसन टोयोटाच्या वाहनांना मोठी मागणी असून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पहिल्याच दिवशी २८ कारची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या ३ महिन्यांत सुमारे २०० वाहनांची विक्री करून पॅटसन टोयोटाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.


Recent Comments