जिद्दीच्या जोरावर कोणतीही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे शक्य आहे, असे प्रतिपादन धारवाड येथील ज्ञानकाशी करिअर अकॅडमीचे मार्गदर्शक एम. एन. रेड्डी यांनी केले.
चिक्कोडी येथील केएलई संस्थेच्या बसवप्रभू कोरे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ‘करिअर गायडन्स’ कार्यशाळेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. केईए मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी चालू घडामोडी, इंग्रजी व्याकरण, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान या विषयांचा सखोल अभ्यास यशाचा मार्ग सुकर करतो असे सांगत त्यांनी विद्यर्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. बी. जी. कुलकर्णी यांनी नियोजनबद्ध अभ्यास, एकाग्रता आणि कौशल्याचा वापर करून यश कसे मिळवावे याबाबत मार्गदर्शन केले.
उपप्राचार्य सुधीर कोठीवाले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ. विनायक मजलापूर, डॉ. गीतांजली दोडमणी, डॉ. बापूगौडा पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौजन्य मठपती हिने ईशस्तवन, तर मंथन पाटील याने स्वागत केले. दिव्या जयगौडर आणि सर्वमंगला मठपती यांनी सूत्रसंचालन णि अंकिता बसण्णावर हिने आभार मानले.


Recent Comments