Vijayapura

विजापूरमधील इंदिरा कॅन्टीनला गॅस टंचाईची झळ

Share

विजापूर जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने इंदिरा कॅन्टीनसह हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. गॅसअभावी अनेक ठिकाणी आता लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.

विजापूर जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या इंदिरा कॅन्टीनच्या सुविधेवर गदा आली आहे. सिलिंडर उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील दोन इंदिरा कॅन्टीन बंद करण्यात आली आहेत, तर शहरातील सहा कॅन्टीनमध्ये अन्नाचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने ग्राहकांची संख्या रोडावली आहे.

दुसरीकडे, खासगी हॉटेल चालकांनी ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी लाकडाच्या चुलींचा आधार घेतला आहे. व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्यामुळे नाईलाजाने हा मार्ग स्वीकारावा लागला असून, यामुळे स्वयंपाकासाठी मोठा विलंब होत असल्याचे हॉटेल मालकांनी म्हटले. प्रशासनाने या सिलिंडर टंचाईवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Tags: