बेळगावमधील उक्कड गावात १५ दिवसांच्या एका नवजात बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. वडिलांनीच मुलीला विष पाजून ठार मारल्याचा गंभीर आरोप पत्नी आणि सासरच्या मंडळींनी केला असून या घटनेने खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हा पत्नीच्या माहेरी आपल्या १५ दिवसांच्या मुलीला पाहण्यासाठी आला होता. तो गेल्यानंतर काही वेळातच बालिकेची प्रकृती बिघडून तिचा मृत्यू झाला. त्याने कपाशीच्या पिकावर फवारण्याचे औषध मुलीला पाजल्याचा आरोप पत्नी आणि तिच्या पालकांनी केला आहे. मुलगी झाल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच डीसीपी नारायण भरमणी आणि काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे. बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगावमधील बिम्स रुग्णालयात हलवण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी सध्या फरार असून काकती पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


Recent Comments