नद्यांचे संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. बेळगावमधील मार्कंडेय नदीच्या पुनरुज्जीवनासाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि ‘मार्कंडेय वाचवा’ पथकाने विशेष स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरण प्रेम जपले आहे.

बेळगावमधील मन्नूर-आंबेवाडी रस्त्यावरील हिंडलगा पंप हाऊस शेजारी वाहणाऱ्या मार्कंडेय नदीत रविवारी भव्य स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि ‘मार्कंडेय वाचवा’ पथकाच्या वतीने आयोजित या अभियानाचे नेतृत्व कृष्ण हित्तलमनी यांनी केले. या कार्यात समाजसेवक आकाश हलगेकर यांनी पूर्ण पाठिंबा देत पर्यावरण रक्षणाच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवला.

नदीपात्रात साचलेला प्लास्टिक आणि इतर कचरा आंदोलकांनी स्वतः उचलून बाहेर काढला, तसेच नदी संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली. या श्रमदान मोहिमेत काशिनाथ कोप्पद, देवयानी पाटील, प्रवीण देवरमणी, प्रताप कांबळे, बावकण्णा पिरगणे, शंकर कांबळे, गजानन मेत्री, श्वेता कोटियान आणि सानिका तेरसे यांच्यासह अनेक पर्यावरण प्रेमी सहभागी झाले होते. नद्यांच्या रक्षणासाठी अशा मोहिमा आगामी काळातही सुरू राहतील, अशी प्रतिक्रिया कृष्ण हित्तलमनी यांनी व्यक्त केली.


Recent Comments