Vijayapura

आशा पाटील यांच्याकडून शिवगिरीतील महादेवाचे दर्शन

Share

विजापूर जिल्ह्याचे पालकमंत्री एम. बी. पाटील यांच्या पत्नी आशा पाटील यांनी काल सायंकाळी विजापूर शहराच्या बाहेरील शिवगिरीला भेट दिली. यावेळी त्यांनी महादेवाचे दर्शन घेऊन विशेष पूजा संपन्न केली.

शहराबाहेर असलेल्या टी. के. पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या शिवगिरीमध्ये महादेवाची विलोभनीय मूर्ती आहे. या ठिकाणी विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आशा पाटील यांनी काल सायंकाळी या परिसरास भेट देऊन ट्रस्टच्या सामाजिक, धार्मिक आणि पर्यावरणपूरक कामांची माहिती घेतली.

शिवगिरी मंदिर आणि तपोवनच्या व्यवस्थापिका आरती पाटील यांनी यावेळी आशा पाटील यांना ट्रस्टच्या उपक्रमांची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यावर आशा पाटील यांनी ट्रस्टच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रसंगी आरती पाटील यांच्या हस्ते आशा पाटील यांना स्मृतीचिन्ह आणि महादेवाचा प्रसाद देण्यात आला.

Tags: