इराण आणि भारत यांच्यात युद्ध सुरू झाले तर मुस्लिम समाज कोणाची साथ देणार, असा संदेश खामेनेईंचे फोटो लावून दिला जात आहे. हे फोटो पोलिसांनी तातडीने हटवावेत, अशी मागणी श्री राम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केली आहे.

सोमवारी बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अफ्झल खान आणि शहीद शिखान यांचे फोटो लावण्यास पोलीस विरोध करतात, मग काँग्रेस राजवटीत खामेनेईंच्या फोटोंना मुभा का दिली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच भानू मुश्ताक यांनी चप्पल घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्याच्या घटनेचा त्यांनी निषेध केला. चप्पल हे घरचे दैवत असेल तर ते डोक्यावर ठेवा, पण महापुरुषांचा अपमान करू नका, असे मुतालिक यांनी म्हटले आहे.
दसरा कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी काँग्रेस सरकारने अशा लोकांना संधी दिल्यामुळेच त्यांचे धाडस वाढले आहे. भानू मुश्ताक यांनी या प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा मुतालिक यांनी दिला. याचसोबत दावणगेरे पोटनिवडणुकीत कोणत्याही मुस्लिम उमेदवाराला तिकीट देऊ नये, अन्यथा श्री राम सेना त्यांचा पराभव करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


Recent Comments