येथील कंग्राळ गल्लीमधील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने आयोजित महिला दिन समारंभास शोभा लोकुर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी शोभा लोकुर यांनी नर्मदा परिक्रमा विषयावर मार्गदर्शन केले, तर अध्यक्षीय भाषणात माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी अनंतराव पाटील व विजया पाटील दांपत्याचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अहवाल वाचन, विविध स्पर्धा आणि बक्षीस वितरण पार पडले. यावेळी शंकर बडवानाचे, अशोक कंग्राळकर, बाबुराव कुट्रे, अंजनाताई शंभूचे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ज्योती सुतार यांनी सूत्रसंचालन तर डॉ. स्वाती खंडागळे यांनी आभार मानले.


Recent Comments