Vijayapura

विजापूरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा नाही :उमेश कारजोळ

Share

विजापूर जिल्ह्यामध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण भाजप युवा नेते उमेश कारजोळ यांनी दिले

विजापूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गॅस पुरवठा व्यवसायात कार्यरत असलेले उमेश कारजोळ यांनी सद्यस्थितीवर प्रसिद्धीपत्रकाद्वारे खुलासा करत अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे इंधन पुरवठ्यात काही प्रमाणात चढ-उतार होणे स्वाभाविक असले, तरी केंद्र सरकारच्या सक्षम नियोजनामुळे विजापूरमध्ये पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. ज्याप्रमाणे कोविड काळात ऑक्सिजनला प्राधान्य दिले होते, तसेच सध्या घरगुती सिलिंडरच्या पुरवठ्यावर भर दिला जात असून व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठाही बंद झालेला नाही. नैसर्गिक इंधनाचा सर्वांनी काटकसरीने वापर करावा, असे आवाहन उमेश कारजोळ यांनी केले आहे.

Tags: