बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि निस्वार्थ सेवा बजावणाऱ्या महिलांचा गौरव करण्याची परंपरा या संस्थेने यंदाही जोपासली आहे.

या वर्षीच्या महिला दिनानिमित्त समाजसेविका भक्ती शिंदे आणि जलतरण प्रशिक्षिका राजश्री पाटील यांना त्यांच्या सामाजिक आणि व्यावसायिक योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. लता कित्तूर यांनी मान्यवर महिलांचा सन्मान kela.
मिळालेला सन्मान भविष्यातील समाजकार्यासाठी अधिक प्रेरणा देणारा ठरेल, अशी भावना भक्ती शिंदे आणि राजश्री पाटील यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, सूर्यकांत हिंडलगेकर, गणेश दड्डीकर, महेश दड्डीकर, प्रसिद्ध चित्रकार वसंत निर्मळे, सीता निर्मळे, सौ. मोदगेकर, सौ. हिरेमठ, सौ. भोसले यांच्यासह अनेक मान्यवर, खेळाडू आणि पालक उपस्थित होते.


Recent Comments