Belagavi

‘जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी’कडून महिला दिन साजरा

Share

बेळगावमधील कांग्राळी खुर्द येथील रामकृष्ण हरी मंगल कार्यालयात ‘जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी’च्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने समाजातील विविध स्तरांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.

समाजात प्रेरणादायी काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करून हा दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये पोलीस विभागातील मंगला पाटील, प्रसार माध्यम क्षेत्रातील मनीषा सन्नाइक, क्रीडा प्रशिक्षक रोहिणी पाटील, समाजसेविका मीरा मादार आणि सामाजिक कार्यकर्त्या सरस्वती पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी डॉ. स्वप्ना चवलीगेर यांनी आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांनी स्वतःचे आरोग्य, आहार आणि व्यायामाकडे लक्ष देणे किती गरजेचे आहे, यावर मोलाचे मार्गदर्शन केले.

जायंट्स सखीच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी कार्यक्रमाचे नेतृत्व करताना महिलांनी सर्वच क्षेत्रांत प्रगती करून आदर्श निर्माण करावा, असे आवाहन केले. या सोहळ्याला फेडरेशन अध्यक्षा अपर्णा पाटील, प्रिया बांदिवडेकर, दीपा पाटील, स्वाती फडके, शीतल पाटील, नम्रता महागावकर, चंद्रा चोपडे, अर्चना संग्रळकर, सुवर्णा काळे, विद्या बंदीवाडेकर यांच्यासह इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: