बेळगाव येथील केएलएस वसंतराव पोतदार पॉलिटेक्निकमध्ये १० आणि ११ मार्च रोजी आयोजित टेक रिइन्फोर्स २०२६ या स्पर्धेत मराठा मंडळ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.

या महोत्सवातील कॅड क्लॅश या तांत्रिक स्पर्धेत सिव्हिल शाखेच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावून कॉलेजचे नाव उज्ज्वल केले. मराठा मंडळ पॉलिटेक्निकचे विद्यार्थी मोहम्मद इश्राक गोरीखान आणि मोहम्मद इस्माईल रंगरेज या जोडीने आपल्या तांत्रिक कौशल्याच्या जोरावर हे यश संपादन केले. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू आणि संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने त्यांचे अभिनंदन केले आहे.
या यशासाठी प्राचार्य आर एस सूर्यवंशी, उपप्राचार्य आशा तोरवी, विभाग प्रमुख सी एस देशपांडे, ललिता शिवशिंपर, आबाजी हुंद्रे आणि प्रशांत मुसळे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले होते. कॉलेजमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Recent Comments