अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला बेळगाव न्यायालयाने ३ वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. काकती पोलिसांनी केलेल्या जलद तपासामुळे आरोपीला दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा झाली असून, अशा प्रवृत्तींना यामुळे कडक इशारा मिळाला आहे.

बेळगाव तालुक्यातील परश्यानट्टी येथील रहिवासी सचिन अपय्या नायक याला अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ३ वर्षांची जेल आणि १०,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पीएसआय मंजुनाथ हुलकुंद आणि रवी वड्डर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने करून न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी या प्रकरणाची सुनावणी करून अंतिम निकाल दिला आहे. सरकारच्या वतीने सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी या प्रकरणात प्रभावी युक्तिवाद मांडला.
तपास प्रक्रियेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेळगाव पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे.


Recent Comments