बेळगावमधील काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या पोक्सो प्रकरणाचा निकाल लागला असून तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या भक्कम पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दीर्घकाळ कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

बेळगाव तालुक्यातील बेनकोळ्ळी येथील रहिवासी ईरप्पा दनाकार याला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने २७ वर्षांची जेल आणि १,२५,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
मार्च २०२५ मध्ये आरोपीने अल्पवयीन मुलीला पुणगुत्ती गावातील जंगल परिसरात नेऊन अत्याचार केले होते. याप्रकरणी काकती पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवघ्या एका महिन्यात आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात यश मिळवले होते.
काकती पोलीस निरीक्षक सुरेश पी. शिंगी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारच्या वतीने सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी न्यायालयात प्रबळ युक्तिवाद मांडला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याने ही कठोर शिक्षा जाहीर केली.
पोलिसांच्या या कारवाईचे बेळगाव पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.


Recent Comments