Belagavi

यमकनमर्डी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; नऊ जणांना अटक

Share

यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत येणाऱ्या जिनराळ गावाजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. या कारवाईत पोलिसांनी नऊ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून हजारो रुपयांची रोकड जप्त केली आहे.

यमकनमर्डीचे सीपीआय जावेद मुशापुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिनराळ गावाच्या हद्दीतील बॅडरट्टी क्रॉस जवळील डायक रोडवर छापा टाकला. सार्वजनिक ठिकाणी पैशांची पैज लावून पत्ते खेळणाऱ्या नऊ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. अटक करण्यात आलेले आरोपी हुक्केरी तालुक्यातील होसूर, येरनाळ आणि शेजारच्या गडहिंग्लज तालुक्यातील हिट्टी व कडलगी गावचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण २३,७३० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. सुभाष अक्कतंगेरहाळ, सचिन पाटील, अयुब खलीफ, राजू घस्ती, भरमप्पा फस्ती, निंगप्पा पाटील, राजू पटोली, महावीर चौगुला आणि मोहम्मद सनदी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags: