Belagavi

बेळगावच्या दोन स्केटर्सपटुंना जिल्हा बाल प्रतिभा पुरस्कार

Share

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या सौरभ साळुंखे आणि अनघा जोशी या खेळाडूंना जिल्हा बाल प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्केटिंग क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

जिल्हा बाल कल्याण आणि महिला सक्षमीकरण विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बेळगावचे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश संदीप पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी दोन्ही गुणवंत खेळाडूंना रोख रक्कम, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. हे खेळाडू सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गंगणे आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. या सन्मानाबद्दल क्रीडापटूंनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Tags: