बेळगाव शहरातील विश्वसनीय सुवर्ण पेढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जोस आलुक्कास’मध्ये आज महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यासोबतच आगामी युगादी सणाचे स्वागत करण्यासाठी ग्राहकांसाठी खास सवलतींची घोषणा करण्यात आली असून, महिला दिनाचे औचित्य साधून या आकर्षक ऑफरचा शुभारंभ करण्यात आला आहे.


जोस आलुक्कास ही लोकप्रिय सुवर्ण पेढी १९६४ मध्ये केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात सुरू झाली आणि आज देशभर तिची ६५ हून अधिक दालने आहेत. दर्जेदार सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनम दागिन्यांच्या विक्रीसोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही ही संस्था नेहमीच अग्रेसर असते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला आणि बाल विकास विभागाच्या शिशु विकास प्रकल्प अधिकारी सुमित्रा, शिक्षण विभागाच्या सेवानिवृत्त अधीक्षक राजेश्वरी, केरळ सांस्कृतिक संघाच्या बेळगाव अध्यक्षा चंद्रिका, सदस्य रेणुका, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऐश्वर्या आणि कायराली कला केंद्राच्या सदस्या हिमा यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी महिला दिनाचा आनंद द्विगुणित करत नवीन ऑफर्सचा शुभारंभ केला.

संस्थेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या विशेष कॅशबॅक आणि सवलत मोहिमेअंतर्गत, सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्रति ग्रॅम १०० रुपयांचे कॅशबॅक व्हाउचर दिले जाणार आहे. याशिवाय हिऱ्याच्या दागिन्यांवर ३० टक्के सवलत आणि प्रत्येक कॅरेटच्या खरेदीवर ५०० मिली ग्रॅमचे सोन्याचे नाणे भेट म्हणून दिले जाणार आहे. या ऑफर्सचा लाभ ग्राहकांना १८ एप्रिलपर्यंत घेता येणार आहे.

याप्रसंगी शिक्षण विभागाच्या सेवानिवृत्त अधीक्षक राजेश्वरी यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना, “जोस आलुक्कासने ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. ग्राहकांना आवश्यक आणि दर्जेदार दागिने उपलब्ध करून देण्यासोबतच, सरकारी शाळांच्या विकासासाठी संस्थेने हाती घेतलेले उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहेत,” अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

दुसऱ्या एका मान्यवराने संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करताना सांगितले की, “जोस आलुक्कास केवळ व्यावसायिक दृष्टीने काम करत नसून, महिला दिनासारखे सण आणि सामाजिक उपक्रमांतही ते सक्रिय आहेत. भविष्यात ही संस्था उत्तरोत्तर अशीच प्रगती करो, हीच सदिच्छा,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऐश्वर्या यांनी महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकत सांगितले की, “आज महिला राष्ट्राध्यक्षपदापासून ते क्रीडा, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रापर्यंत सर्वत्र आपली अमीट छाप उमटवत आहेत. अशा सक्षम महिलांना प्रोत्साहन देत महिला दिन साजरा केल्याबद्दल मी जोस आलुक्कासची आभारी आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.


Recent Comments