बेळगावात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शहापूर येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मार्गावर असलेल्या श्री छत्रपती शिवाजी उद्यानात शुक्रवारी सकाळी शिवजयंतीचा सोहळा पार पडला. शिवसेनेचे संघटक तानाजी पाावशे, एस. के. पोटे आणि उप जिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी संयुक्तपणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी शिवभक्तांनी दिलेल्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.
या पूजेच्या कार्यक्रमाला उपशहर प्रमुख राजू तुडेकर, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, सी. पी. धाडी, विठ्ठल उंद्रे, अमर कडगावकर, नारायण पाटील, संजय चतूर, मयुरेश काकतकर, बाळू भोसले, स्वराज पाटील, संदीप धामणेकर, बाळकृष्ण चव्हाण पाटील, विक्रांत शिंदे, सूरज शहापूरकर आणि गजानन वेर्णेकर यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments