DEATH

हलगा येथील धाकलु बिळगोजी यांचे निधन

Share

बेळगाव तालुक्यातील हलगा येथील प्रगतशील शेतकरी आणि देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धाकलु फकिरा बिळगोजी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

गेल्या सहा दशकांपासून हलगा येथील हजरत बीबी फातिमा दर्ग्याचे मुख्य सेवक म्हणून कार्यरत असलेल्या धाकलु बिळगोजी यांनी सामाजिक आणि धार्मिक सलोखा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. सर्वधर्मीय भाविकांच्या समस्यांचे निराकरण करतानाच गावातील प्रत्येक सामाजिक उपक्रमात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर हलगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: