भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे आज बेळगाव दौऱ्यावर आगमन झाले. चिक्कोडी तालुक्यातील येडूर येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले असून सांबरा विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.


उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे गुरुवारी सकाळी विशेष विमानाने सांबरा विमानतळावर आगमन झाले. यावेळी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी उपराष्ट्रपतींचे स्वागत केले. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील येडूर गावात होणाऱ्या धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ते या दौऱ्यावर आले आहेत.


विमानतळावर जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, राज्यसभा सदस्य ईरण्णा कडाडी आणि महापौर मंगेश पवार यांनी उपराष्ट्रपतींचे स्वागत केले. यावेळी विभागीय आयुक्त जानकी के. एम. आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विमानतळावरील स्वागत स्वीकारल्यानंतर उपराष्ट्रपती कडक बंदोबस्तात येडूरमधील नियोजित कार्यक्रमाकडे रवाना झाले.




Recent Comments