Belagavi

सेल्फ डिफेन्स स्कूलच्या वतीने कराटे परीक्षेचे यशस्वी आयोजन

Share

बेळगाव येथील बीडीबीए सभागृहात ‘सेल्फ डिफेन्स स्कूल इंडियन कराटे’ संस्थेच्या वतीने कराटे परीक्षा आणि बेल्ट प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकूण ३५ विद्यार्थ्यांनी कराटे प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. या सोहळ्यात यशस्वी ठरलेल्या इरा बोगार आणि रुशांक गोवनकोप्प यांना ‘येलो बेल्ट’, तर अर्णव कावळे आणि पवन हेगडे यांना ‘ग्रीन बेल्ट’ प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वयोगट आणि कौशल्यानुसार त्यांना विविध रंगांच्या बेल्टचे वितरण करण्यात आले. यावेळी समर्थ साळुंके, अताश्री धुडुम आणि अर्चना कुरुप यांना ‘ऑरेंज बेल्ट’ देऊन सन्मानित करण्यात आले.

उच्च स्तरावरील कामगिरीसाठी क्रांती पाटील, निधी वेर्णेकर, नेहा पोटे, अरहब दोषी आणि कुंदन परमार यांना पर्पल, ब्लू आणि ब्राऊन बेल्ट देऊन गौरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय कराटे मास्टर मधु पाटील, आकाश पाटील आणि प्रसाद पाटील यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. आजच्या काळात स्वसंरक्षणाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी कराटे प्रशिक्षणात दाखवलेल्या या चिकाटीचे पालकांनी कौतुक केले आहे.

Tags: