Belagavi

चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर उद्या कपिलेश्वर मंदिराचे दरवाजे राहणार बंद

Share

उद्या होणाऱ्या चंद्रग्रहणामुळे बेळगावमधील श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्या दैनंदिन वेळेत बदल करण्यात आला आहे. ग्रहणाच्या काळात मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला असून, भाविकांना ठराविक वेळेतच दर्शन घेता येणार आहे.

उद्या होणाऱ्या चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर कपिलेश्वर मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. उद्या सकाळी नित्यपूजा झाल्यानंतर शिवलिंगावर बेलपत्रांचे आवरण घातले जाईल. सकाळी ११ वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मंदिराचे दरवाजे बंद राहतील. सायंकाळी ७ वाजता मंदिर पुन्हा उघडले जाईल, त्यानंतर शुद्धीकरण विधी आणि अभिषेक झाल्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येईल.

ग्रहणाचा काळ आणि होळी एकाच वेळी आल्याने मंदिर प्रशासनाने भाविकांना विशेष आवाहन केले आहे. ग्रहणाच्या वेळेत रंग खेळणे टाळून ४ मार्च रोजी होळी साजरी करणे योग्य राहील, असे मंदिराच्या पुजाऱ्यांनी म्हटले आहे. या काळात श्रद्धाळूंनी नामस्मरण करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

याशिवाय, ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आहार आणि इतर धार्मिक पथ्यांबाबत पुजाऱ्यांनी भाविकांना मार्गदर्शन केले आहे. ग्रहण स्पर्श होण्यापूर्वी भोजन आटोपावे आणि योग्य खबरदारी घ्यावी, असे पुजाऱ्यांनी म्हटले आहे. मंदिर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: