बागलकोट येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीवर आणि पोलिसांवर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ आज विजापूर शहर समस्त मराठा समाजाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.


बागलकोट शहरात शिवजयंतीची मिरवणूक सुरू असताना काही देशद्रोही प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. या कृत्याचा तीव्र निषेध नोंदवत, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कर्नाटक सरकारनेही अशा गुन्हेगारांना अद्दल घडवावी आणि कडक कायदेशीर शिक्षा द्यावी, या घटनेतील समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विजापूर मधील मराठा समाजाने केली आहे.
या आंदोलनाप्रसंगी मराठा समाज अध्यक्ष विजयकुमार एस. चव्हाण, महानगरपालिका सदस्य राहुल जाधव, राजू मोरे, तानाजी जाधव, शंकर कणसे, भीमशंकर शेवाळकर, विजयकुमार घाटगे, संजय जाधव, विजय पवार, अप्पु मस्ये, संगमेश जाधव, अशोक हसंगे, सतीश डोबळे, रामू चव्हाण, संपत कुलकर्णी, मोहन शिंदे, सदाशिव कदंब, अर्जुन जाधव, विकास चव्हाण, विनोद गौळी, रोहित चव्हाण, दत्ता गोलांडे, सुरेश चव्हाण आणि पप्पू सूर्यवंशी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments