बेळगावमधील सरकारी शाळांच्या विकासासाठी आमदार आसिफ सेठ यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. माळी गल्लीतील विविध शाळांना भेट देऊन त्यांनी विकासकामांची पाहणी केली व दर्जेदार शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचे आश्वासन दिले.


बेळगावच्या माळी गल्लीतील सरकारी मराठी प्राथमिक शाळा क्रमांक ४, उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक २ आणि सरकारी कन्नड प्राथमिक शाळेला आमदार आसिफ सेठ यांनी भेट देऊन पाहणी केली. शाळांमध्ये सुरू असलेल्या दुरुस्ती कामांची त्यांनी स्वतः पाहणी करत वर्गखोल्या, छप्पर, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याच्या सोयींची माहिती घेतली. केवळ पुस्तकी शिक्षणच नव्हे, तर मुलांना सुसज्ज आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य असल्याचे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले.

शाळेच्या परिसरातील अंतर्गत सुविधांसोबतच बाहेरील रस्ते, गटार व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतही आमदारांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शाळांच्या आजूबाजूच्या पायाभूत सुविधा चांगल्या असतील तरच शैक्षणिक प्रगती शक्य आहे, असे मत आमदार आसिफ सेठ यांनी व्यक्त केले. तसेच प्रलंबित असलेली दुरुस्तीची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे कडक निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


Recent Comments