बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची मुदत संपत असल्याने नवीन निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी निवडणूक प्रक्रिया राबवण्याबाबत विभागीय आयुक्तांना अधिकृत पत्र लिहिले आहे.

बुधवारी बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाची मुदत १४ मार्च रोजी संपणार आहे. आगामी काळासाठी महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ गटासाठी, तर उपमहापौरपद ‘सर्वसाधारण’ गटासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत ५८ नगरसेवक तसेच ७ आमदार, खासदार आणि मंत्री असे एकूण ६५ मतदार मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती आयुक्त कार्तिक एम. यांनी दिली आहे.


Recent Comments