खानापूर येथील निंगापूर गल्लीचे रहिवासी आणि नगरपंचायतीचे माजी सदस्य विलास परशराम मोरे (७०) यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. त्यांनी नगरपंचायतीचे स्थायी समिती सभापती आणि सदस्य म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावली होती.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. आज दुपारी २ वाजता खानापूर येथील ‘मोक्षधाम’ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


Recent Comments