Belagavi

बस्तवाडमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ

Share

​बस्तवाड येथील विविध विकासकामांचा शुभारंभ करताना महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी माणुसकी आणि सद्भावनेचा संदेश दिला. केवळ द्वेष करून देव प्रसन्न होत नाही, तर एकमेकांचा आदर करणे हीच आपली खरी संस्कृती असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

​बस्तवाड गावात २ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीतून रस्ता आणि १.१८ कोटी रुपये खर्चाच्या कल्मेश्वर मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते पार पडले. गावच्या विकासासाठी सर्व धर्मीय एकत्र येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मंत्री असूनही मी तुमची बहीण म्हणूनच काम करत असून, पराभवाच्या काळातही जनतेशी नाळ जोडल्यामुळेच आज मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहे. गृहलक्ष्मी योजनेमुळे महिलांचा स्वाभिमान उंचावत असून मतदारसंघाचा विकास हीच माझी प्राथमिकता असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

​आम्ही केवळ बोलण्यावर नाही तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवणारे आहोत. समाजातील भांडणे मिटवून सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचे आमचे धोरण असून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी दिली. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मतदारसंघाच्या विकासाचा २५ वर्षांचा आराखडा तयार केला असून शिक्षण आणि जलसंधारणाच्या कामांना गती दिली जात असल्याची प्रतिक्रिया चन्नराज हट्टीहोळी यांनी व्यक्त केली.

​या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील, मनोहर बांडगी, शिल्पा पाटील, माणिक संकेश्वरी, पीडीओ आशा, नेमू पाटील, गोपाळ कामाज, शिवाजी काकतकर, ईरप्पा चौगुले, बर्मा गौडकेच्चप्पगोळ, बशीर किल्लेवाले, विठ्ठल पाटील, गुंडू चौगुले, केशव चौगुले, समीर सनदी, अप्पय्या अण्णा यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: