बेळगाव तालुक्यातील मच्छे गावात गुरुवारी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला असून या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मच्छे गावात घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच बेळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पुतळ्यावर फासण्यात आलेल्या त्या संशयास्पद पदार्थाचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या विटंबनेमागील नेमका उद्देश काय होता, याचा शोध घेण्यासाठी पोलीस पुतळ्यापासून अवघ्या १० मीटर अंतरावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी तक्रारदारांची चौकशी सुरू केली असून दोषींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. गावात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. रायण्णा प्रेमींनी संयम राखून शांतता राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.


Recent Comments