Belagavi

बेळगावात अत्याधुनिक ‘जंबगी सुपर स्पेशालिटी’ नेत्र रुग्णालयाचे २२ फेब्रुवारीला उद्घाटन

Share

बेळगावमधील नागरिकांच्या सेवेसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सज्ज असलेल्या ‘जंबगी सुपर स्पेशालिटी’ नेत्र रुग्णालयाचे २२ फेब्रुवारीला लोकार्पण होणार असल्याची माहिती जंबगी ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मण जंबगी यांनी दिली.

गुरुवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत लक्ष्मण जंबगी बोलत होते. रोगाचे अचूक निदान आणि क्लिनिकल निकालांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने हे अत्याधुनिक निदान आणि शस्त्रक्रिया केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ‘रोबोटिक’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, कॉर्निया संबंधित प्रक्रियांसाठी प्रगत ‘९० एक्सेमर लेझर’ मशीन बसवण्यात आले आहे, असे लक्ष्मण जंबगी यांनी सांगितले.

निवडक रुग्णांच्या शस्त्रक्रियेमध्ये हे तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी असून, यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान कमी त्रास होतो आणि दृष्टी लवकर परतण्यास मदत होते, अशी माहिती लक्ष्मण जंबगी यांनी दिली.

अत्याधुनिक रोबोटिक आणि लेझर उपचारांसाठी या भागातील नागरिकांना आता मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही. बेळगावमध्येच एकाच छताखाली डोळ्यांशी संबंधित सर्व आजारांवर सर्वसमावेशक शस्त्रक्रिया आणि सुश्रुषा उपलब्ध करून देणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे लक्ष्मण जंबगी यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. वर्षा जंबगी, डॉ. अमोघ जंबगी, डॉ. हेमंत, डॉ. जगदीश पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: