Belagavi

बेळगावात मेडिकल शॉपच्या बेजबाबदारपणाला महापालिकेचा लगाम

Share

बेळगाव स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आलेल्या झाडांच्या कुंड्यांचा वापर कचरा टाकण्यासाठी करणाऱ्या मेडिकल शॉपवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. अशोक नगर परिसरातील एका मेडिकल शॉपचा हा बेजबाबदारपणा समोर आला असून महापालिकेने त्यांना चांगलाच दणका दिला आहे.

अशोक नगर भागात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या झाडांच्या कुंड्यांमध्ये बेकायदा वैद्यकीय कचरा टाकल्याप्रप्रकरणी संबंधित मेडिकल शॉपला २,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि कुंड्यांमध्ये इंजेक्शनच्या सुया, औषधांची रिकामी पाकिटे आणि इतर घातक वैद्यकीय कचरा टाकल्याचे महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते.

या प्रकारामुळे पर्यावरणाचे नुकसान होण्यासोबतच संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली होती. या घटनेची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. या बेजबाबदार कृत्याबद्दल संबंधित मेडिकल शॉपला दंड आकारण्यात आला असून, भविष्यात अशा प्रकारची चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

Tags: